सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'तर्फे उरणच्या शेतकऱ्यांचा 'गट शेती' मंत्र; ३ दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    30-01-2026 10:42:42

उरण : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'च्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणासाठी उरण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपारिक शेतीला व्यावसायिक जोड देऊन 'गट शेती'च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याचे मोलाचे धडे यावेळी देण्यात आले.खेळांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा नवा पॅटर्न हे प्रशिक्षण शिबिर इतर शिबिरांपेक्षा वेगळे ठरले ते त्यातील शिकवण्याच्या पद्धतीमुळे. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षकांनी कोरड्या व्याख्यानांऐवजी विविध खेळ आणि उपक्रमांच्या माध्यमातून गट शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले. "एकटा शेतकरी हतबल ठरू शकतो, पण संघटित गट शेतीमुळे बाजारपेठ काबीज करता येते," हा संदेश खेळांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.

शेतकऱ्यांच्या भूमिकेवर विशेष भर :- 

गट शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची भूमिका (Role) काय असावी, गटाचे नियोजन कसे करावे, खर्च कमी करून नफा कसा वाढवावा आणि एकमेकांवर विश्वास ठेवून सामूहिक प्रगती कशी साधावी, यावर प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उरणच्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद :- 

उरण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "साने गुरुजी स्मारकाच्या पवित्र वातावरणात मिळालेले हे ज्ञान आमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरेल. आता आम्ही केवळ शेतकरी राहणार नाही, तर एक उद्योजक म्हणून काम करू." या यशस्वी आयोजनाबद्दल उरणच्या शेतकरी बांधवांनी पाणी फाउंडेशनच्या टीमचे आणि साने गुरुजी स्मारकाचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे उरण परिसरातील शेती क्षेत्रात आता मोठ्या बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती