सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    30-01-2026 10:50:30

उरण : रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीनेत्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक,कामगारहिताच्या व जनसेवेतील कार्याचे कौतुक केले.पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची पोचपावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या प्रसंगी मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनेमहेंद्रशेठ घरत यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मुरबा गणपती ट्रस्ट चे पदाधिकारी व न्हावे गावातील महिला उपस्थित होत्या.


 Give Feedback



 जाहिराती