सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी

डिजिटल पुणे    30-01-2026 10:59:28

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. त्यानंतर आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या.

अस्थी संकलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते. त्यांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबीय, नातेवाईक आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजित पवारांच्या निधनानंतरही बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात शोककळा पसरलेली असून आजही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी

अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेच्या तपासासाठी बारामती पोलिसांना अपघातस्थळी कोणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अपघाती मृत्यू नोंदीच्या आधारे तपास सुरू आहे.

अपघात नेमका कसा झाला? प्राथमिक अहवालात काय?

सरकारी प्राथमिक अहवालानुसार,28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता सदर विमान बारामती एटीसीच्या संपर्कात आले होते. त्यावेळी वैमानिकांना हवामान अनुकूल असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली होती.विमानाने रनवे क्रमांक 11 वर उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र वैमानिकांनी रनवे स्पष्ट दिसत नसल्याचे एटीसीला कळवले. काही वेळाने रनवे लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला, मात्र त्यानंतर वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.थोड्याच वेळात धावपट्टीच्या डाव्या बाजूला आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले, अशी माहिती एटीसीमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती