सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या आधारे तपास

डिजिटल पुणे    30-01-2026 11:20:56

बारामती :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असतानाच, त्यांच्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अपघाताच्या अनुषंगाने एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) नुसार सखोल तपास केला जाणार आहे.

बुधवारी (दि. 28) सकाळी बारामतीजवळ घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. गुरुवारी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात हजारो नागरिकांनी ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा देत श्रद्धांजली अर्पण केली. राज्यभर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

CID चौकशीचे आदेश, परिसर सील

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत

CID चौकशीचे आदेश दिले आहेत

 अपघातस्थळी कोणालाही जाण्यास मनाई

 फॉरेन्सिक टीमकडून नमुने गोळा

 बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ADR च्या आधारे तपास

असा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या प्राथमिक अहवालात काय निष्पन्न?

सरकारी अहवालानुसार ,28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता विमानाचा बारामती एटीसीशी संपर्क झाला. त्या वेळी दृश्यमानता सुमारे 3000 मीटर होती. पायलटने रनवे क्रमांक 11 कडे येत असल्याची माहिती दिली. मात्र धुक्यामुळे रनवे स्पष्ट दिसत नसल्याचे कळवले. 8.43 वाजता रनवे लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग आणि धुराचे लोट दिसले .एटीसीवरील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

▪️ पुणे–बारामती परिसरात दाट धुके

▪️ बारामती विमानतळावर ILS सुविधा उपलब्ध नाही

▪️ पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली

▪️ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (Aborted Landing)

▪️ दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा तोल गेला

▪️ सुमारे 100 फूट उंचीवरून विमान कोसळले

▪️ रनवेच्या आधीच जमिनीवर आदळले

▪️ भीषण स्फोट होऊन आग लागली

▪️ आगीमुळे तात्काळ बचावकार्य अशक्य

DGCA च्या प्राथमिक माहितीनुसार हा टेबल-टॉप रनवे असल्याने धोका अधिक होता.

प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक अनुभव

अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले,“आम्ही धावत गेलो, पण आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे जवळ जाणं शक्य नव्हतं. काही मिनिटांतच संपूर्ण विमान जळून खाक झालं.”

DGCA अहवालानंतरच अंतिम निष्कर्ष

सध्या  CID, DGCA , फॉरेन्सिक टीम या तिन्ही यंत्रणा तपास करत असून, अंतिम अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती