सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात शहीद झालेले सुरक्षारक्षक पोलिस हवालदार विदीप जाधव (वय ४३) यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. “मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन…” असे सांगून घरातून निघालेले विदीप जाधव थेट तिरंग्यात लपेटून परतल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्यांचा १० वर्षांचा मुलगा अद्विक याने पित्याच्या पार्थिवावर विधी पार पाडले, हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
साधा स्वभाव, कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी मूळचे तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील रहिवासी असलेले विदीप जाधव २००९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते.२०१० पासून त्यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. ए. सानप यांचे सुरक्षारक्षक , २०१४ ते २०१९ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंगरक्षक २०१९ पासून – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सुरक्षारक्षककर्तव्यनिष्ठ, शांत स्वभाव आणि अत्यंत साधेपणाने वावरणारा अधिकारी अशीच त्यांची ओळख होती.
कुटुंबावर कोसळले दुःखाचे सावट
विदीप जाधव यांनी ‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन’ असं सांगितलं होतं, पण विदीप जाधव हे तिरंग्यात लपेटून परतल्याचे पाहून त्यांच्या वृद्ध आई वडिलांनी आणि पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांची काळीज चिरणारा होता. विदीप जाधव यांच्या पश्चात आई-वडील पत्नी संध्या (३८) मुलगी नेत्रा (१४) मुलगा अद्विक (१०) दोन बहिणी व तीन भाऊअसा मोठा परिवार आहे. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पाहताच पत्नी, आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.त्यांच्या निधनाने ते राहत असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे.
विमान अपघाताचा थरारक घटनाक्रम
पुणे–बारामती परिसरात दाट धुके
दृश्यमानता अत्यंत कमी
बारामती विमानतळावर ILS सुविधा नाही
पायलटने मॅन्युअल लँडिंगचा प्रयत्न केला
पहिला लँडिंग प्रयत्न रद्द
दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा तोल गेला
रनवे गाठण्याआधीच जमिनीवर आदळले
जोरदार स्फोट व आग
आगीमुळे तात्काळ मदत शक्य नाही
अपघातात अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू
सध्या DGCA कडून तपास सुरू असून अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.