नाशिक : ऑनलाईन शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका नागरिकाची तब्बल 65 लाख 44 हजार 837 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी झाली फसवणूक?
फिर्यादीला जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत विविध व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून संपर्क करण्यात आला. समोरच्यांनी स्वतःला शेअर मार्केट तज्ज्ञ व ब्रोकर असल्याचे सांगत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास बसल्याने फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम ट्रान्सफर केली.मात्र पैसे पाठवल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही, तसेच संबंधित व्यक्तींचा संपर्कही तुटला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपास सुरू
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.