सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

जासई जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    31-01-2026 14:35:28

उरण : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, जासई जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील व चिर्ले पंचायत समिती गणातील काँग्रेस, शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रियांका दीपक मढवी यांचा जासई धुतुम, करळ, सोनारी, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विधणे या ग्रामपंचायतींच्या विविध गावांसह रानसई  ग्रामपंचायत आदिवासी वाड्या परिसरात प्रचाराचा झंझावात सुरू असून, घरोघरी जाऊन उमेदवार व कार्यकर्ते  प्रचार पत्रकाचे वाटप करत आहेत. प्रत्येक गावागावात उमेदवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. फेब्रुवारी २००७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जासई मतदारसंघातून, स्वतंत्र काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या डॉ.मनिष पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा यांवर भर देऊन, मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. 

आजही विकासाचा धडाका सुरू आहे. मतदार संघातील मतदार हे जागृत मतदार आहेत. महाआघाडीला मत म्हणजे विकासाला मत त्यामुळे जासई  जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान तालुक्यातील विंधणे, वेश्वीसह अनेक गावांमध्ये शुक्रवारी, शनिवारी या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी  त्यांनी गावा गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उमेदवारांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधून, हाताचा पंजा व खटारा चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. प्रचारात महिला, तरुण मंडळी, जेष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला.

प्रचारात डॉ.मनिष पाटील व प्रियांका मढवी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, ज्येष्ठ नेते के बी पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, स्वाती मुंबईकर, सुरेश कडू, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, प्रकाश मुंबईकर, जगदीश पाटील, रवींद्र पाटील, परेश पाटील, शरद पालकर, महेंद्र मुंबईकर, अरविंद पाटील, राम पालकर, गोपाळ पाटील, अच्युत कडू, विकास पाटील, कैलास डाकी, सुरेश डाकी, सुनील मढवी, अविनाश पाटील, दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, बी एम ठाकूर, रामकृष्ण नवाळे, गणेश पाटील, विनोद पाटील, किशोर पाटील, बळीराम नवाळे, सुमन पाटील, प्रेमनाथ ठाकूर, सूर्यकांत कासकर, समाधान जोशी, अभिजीत जोशी, अलंकार पाटील, दिनकर पाटील, शक्ति म्हात्रे, कैलास थळी, वैभव घरत, दत्तात्रेय नवाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती