सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय:अजितदादांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे ,आज उपमुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ

डिजिटल पुणे    31-01-2026 15:18:52

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या आज सायंकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

विधानभवनात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदार, मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला, तर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर सर्वानुमते त्यांची गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली.

आज सायंकाळी शपथविधी

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज सायंकाळी ५ वाजता राजभवनात होणार आहे. ५ ते ५:१२ या वेळेत हा सोहळा पार पडेल. अतिरिक्त पदभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. आज फक्त सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून अन्य कुणीही शपथ घेणार नाही.

कोणती खाती सांभाळणार?

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी होती. मात्र, सध्या अर्थ खाते वगळता उर्वरित खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.आज त्या केवळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील; इतर खात्यांचा औपचारिक निर्णय नंतर घेतला जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती