सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

'पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हल' मध्ये नृत्यपरंपरेचे बहारदार सादरीकरण

डिजिटल पुणे    02-02-2026 11:54:02

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे  इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहात झालेल्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक कलाकारांचे  देशातील विविध शास्त्रीय व लोकनृत्य प्रकारांचे सशक्त सादरीकरण रसिकांना अनुभवता आले.

दुसऱ्या दिवशीच्या सादरीकरणांचे उदघाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता  झाले.यावेळी ज्येष्ठ नृत्य अभ्यासक श्यामहरी चक्र,साधना नृत्यालयाच्या संस्थापक सुमेधा महाजन,भारतीय विद्या भवन चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे  हे उपस्थित होते.फेस्टिव्हलच्या निमंत्रक रसिका गुमास्ते, समन्वयक सुवर्णा बाग तसेच संयोजन समिती सदस्य नेहा मुथियान, अस्मिता ठाकूर, शमा अधिकारी, वरदा वैशंपायन यांनी  स्वागत केले.पहिल्या सत्रात   भरतनाट्यम, कथक, ओडिसी, सत्रिया आणि लोकनृत्य अशा विविध नृत्यशैली सादर करण्यात आल्या. सायंकाळी साडेचार ते रात्री ८ या वेळात दुसऱ्या सत्रात फेस्टिव्हलमधील विविध नृत्य सादरीकरणे आणि  'नृत्य आणि मानसिक स्वास्थ ' विषयावर चर्चासत्र पार पडले.हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य होता.

 भरतनाट्यममध्ये नेहा आपटे, गायत्री जोशी आणि श्रावणी सरदेसाई यांनी शास्त्रीय बांधणीसह भावपूर्ण अभिव्यक्ती सादर केली. कथक पाठशाला, रमा गदो, शुभत्रयी सटवे आणि वृंदना मोहरिर यांच्या सादरीकरणाने लय आणि तालाची समृद्ध परंपरा उलगडली. ओडिसी नृत्यात तमाल दास, सुभाष्री रौत्राय, समृद्धी सेलार आणि इरावती ढेंबरे यांनी शिल्पसौंदर्य आणि नृत्याभिनयाचा सुरेख संगम सादर केला. सत्रिया नृत्यात साक्षी गायकवाड तर लोकनृत्यात सुखदा खांडगे  यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.सायंकाळच्या सत्रात नृत्यसादरीकरणासोबतच नृत्य आणि मानसिक आरोग्य या विषयावर विशेष पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चासत्रात हृषीकेश पवार ,कल्याणी काणे ,तन्वी हेगडे  सहभागी झाले . 

नंतर रुही, गायत्री, रुचा, तन्वी आणि  अदिती यांनी नृत्ये सादर केली. भरतनाट्यम सादरीकरणात लिसांद्रा कॉंच, बृंदाली पटेल, मयुरी नृत्यालय, ऋद्धी पोर्दार आणि नियती मिसाळ यांनी रंगत आणली. कथक प्रकारात पायल नृत्यालय, श्यामली चौधरी आणि पल्लवी लेले यांनी प्रभावी सादरीकरण केले. ओडिसी नृत्यात अदिती कुलकर्णी, श्रेयसी गोस्वामी, वरदा  वैशंपायन आणि योगिता भसिन यांनी आपली कला सादर केली, तर सत्रिया नृत्यात डॉ. देविका बोरठाकूर यांनी आसामी नृत्यपरंपरेचा परिचय करून दिला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित या महोत्सवाने पुण्यातील रसिकांना भारतीय नृत्यपरंपरेची वैविध्यपूर्ण झलक दाखवली. दोन्ही सत्रांना रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली आणि कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हल च्या वतीने इंदिरा इंस्टिट्यूट च्या तरिता शंकर ,भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकीर्डे यांचे आभार मानण्यात आले .


 Give Feedback



 जाहिराती