सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

खोपटे गावातील रस्त्यामध्ये दगड ठेऊन रस्ता अडवल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांमध्ये संताप ;दगड न हलविल्यास आंदोलनाचा इशारा

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    02-02-2026 14:50:58

उरण : उरण तालुक्यातील खोपटे येथील गावाच्या वेशीवर असलेल्या रस्त्यामध्ये मोठमोठे दगड ठेऊन येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या रंगानाथ पाटील यांनी रस्ता अडवल्याने या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या अनेक वाहनचालक  व पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील बांधपाडा ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही सदर रस्त्यावर आकसाने दगड ठेऊन रस्ता अडवल्याने संपूर्ण गावातील ग्रामस्थ व महिला संताप व्यक्त करीत आहेत.गावचे पोलीस पाटीलच गावचा रस्ता अडवीत असतील तर त्यांना पोलीस पाटील पदावर राहण्याचा अधिकारच उरत नसल्याचे येथील ग्रामस्थ म्हणत आहेत.तर रस्त्यातील दगड न काढल्यास येथील ग्रामस्थ या रस्ता अडवीणाऱ्या पोलीस पाटलाच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा येथील ज्येष्ठ नागरिक विनायक पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती