सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात…विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

डिजिटल पुणे    02-02-2026 15:25:01

सातारा/फलटण : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.दिवंगत जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी जाधव कुटुंबियास आधार दिला. या भावस्पर्शी भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.


 Give Feedback



 जाहिराती