सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

मतिमंद तरुणीवरील अत्याचारप्रकरणी पाच महिन्यांनी वडिलांना अटक

डिजिटल पुणे    05-02-2026 11:57:10

मुंबई : कफ परेड परिसरातील मतिमंद तरुणीवरील अत्याचारप्रकरणी पाच महिन्यांनंतर धक्कादायक घडामोड घडली आहे. नवजात अर्भकाच्या डीएनए अहवालात वडिलांशी जुळणी झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.

सप्टेंबरमध्ये तरुणीला पोटदुखीमुळे कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले होते. मानसिक स्थितीमुळे ती नेमके काय घडले हे सांगू शकत नव्हती, तसेच सुरुवातीला कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला होता.

त्यानंतर पोलिसांनी मानसोपचार तज्ञांच्या मदतीने चित्रे व प्रतिकात्मक पद्धती वापरून तिचा जबाब नोंदवला. परिसरातील संशयित व्यक्तींचे डीएनए नमुने घेण्यात आले आणि त्यातून वडिलांचा सहभाग निष्पन्न झाला. याप्रकरणी आधीच एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून अल्पवयीन संशयितालाही ताब्यात घेण्यात आले होते; आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती