सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

उरण पोलीस ठाणे ने घेतला रूट मार्च.;नागरिकांनी शांततेने मतदान करावे, पोलीस प्रशासनातर्फे आवाहन

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    05-02-2026 14:54:25

उरण : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उरण पोलीस ठाणे ने जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावात रूट मार्च घेतला. या रूट मार्चचा उद्देश शांतता राखणे आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करणे हा होता.रूट मार्च जासई पोलीस चौकी येथून सुरू होऊन, जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावातून फिरून उरण एस.टी.स्टँड चारफाटा येथे समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहूल काटवाणी, ०७ सपोनि/ पोउपनिरी, १५ पोलीस अंमलदार, तसेच RCP चे ०१ अधिकारी व १९ अंमलदार व QRT चे १० अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे, तर मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.तर उरण पोलीस ठाणे ने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाणे ने शांतता राखण्याचे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती