सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

टॅक्सीचालकाची मनमानी; अल्प अंतरासाठी 2 हजार वसूल — पोलिसांची धडक कारवाई

डिजिटल पुणे    05-02-2026 17:58:38

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज लाखो प्रवासी रेल्वे, विमान आणि रस्ते मार्गाने ये-जा करतात. मात्र, शहरात येणाऱ्या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मीटर बंद ठेवून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, प्रवाशांना धमकावणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

असाच धक्कादायक प्रकार दादर रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरात उघडकीस आला आहे. 24 ते 26 जानेवारी दरम्यान दोन टॅक्सीचालकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी दोन प्रवाशांकडून अल्प अंतरासाठी अनुक्रमे 1,800 आणि 2,000 रुपये वसूल केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करताच हा रॅकेट उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेल्या 4 टॅक्सी जप्त केल्या आहेत. तसेच फसवणुकीतून मिळवलेली रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.

दादर परिसरात काही ठराविक टॅक्सीचालकांकडून अशा प्रकारे प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने अशा घटना वाढल्या होत्या. आता पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

फेरीवाल्यांवरही कारवाई

दरम्यान, दादर रेल्वे स्टेशन (पूर्व), माटुंगा स्टेशन परिसर आणि माहेश्वरी उद्यान सर्कल भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. बीएमसीच्या एफ-नॉर्थ विभागासोबत संयुक्त कारवाई करत 98 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती