सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; कोणताही सोहळा नाही

डिजिटल पुणे    06-02-2026 16:08:59

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारी रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शोकाचे वातावरण असताना आनंदोत्सव करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन केले आहे.तसेच त्यांनी विनंती केली आहे की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत किंवा शुभेच्छांचे होर्डिंग्ज, बॅनर लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी कोणताही जल्लोष किंवा मेळावे होऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

यावेळी शिंदे म्हणाले, “अजित दादांच्या जाण्याने मला वैयक्तिक मोठा धक्का बसला आहे. मी एक सहकारीच नव्हे तर जवळचा मित्र गमावला आहे. ही पोकळी भरून निघणारी नाही. पवार कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णपणे सहभागी आहे.”राज्य अजूनही या धक्क्यातून सावरलेले नसताना वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नाही, असे सांगत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती