उरण : सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने व फुले शाहू आंबेडकरी विचाराचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने २०२१ साली सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांनी डी के ग्रुप ची स्थापना केली. डी के ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूना साहित्य वाटप असे अनेक कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले असून गोर गरीब जनतेच्या वेगवेगळ्या अडी अडचणी सोडविण्यात आले आहेत.खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांना प्रोत्साहन मिळावे, उरण मधील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या हेतूने सिद्धार्थनगर ११ तर्फे उरण कोटनाका, पेट्रोल पंपा पाठीमागील मैदानात भव्य दिव्य असे डि.के.ग्रुप चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अर्णव ११ मोठी जुई संघाने प्रथम क्रमांक पटकविला असून द्वितीय क्रमांक साई माऊली मोरा,तृतीय क्रमांक विंधणे संघ, मॅन ऑफ द सिरीज विंधणे संघाचा आकाश, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोठी जुई संघाचा निनाद याला मान मिळाला आहे. यावेळी डी के ग्रुपचे अध्यक्ष दिनेश गायकवाड, कुणाल म्हात्रे, बळीराम मसन, सनी भोईर, संकेत पाटील, ऋषिकेश कासारे, जयेश गायकवाड, लकी भिसे, नागेश गायकवाड, आदित्य भिसे, प्रेम गायकवाड,बहुजन समाज पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड, बसपाचे रायगड प्रभारी राहुल बेनवाल, विकास निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी के ग्रुपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा सर्वत्र प्रचार करणाऱ्या या संघटनेतर्फे आरोग्याला जपा निरोगी रहा, खेळा शरीर तंदुरुस्त ठेवा अशी आरोग्य विषयक जनजागृती या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.