सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

डिझाईन थिंकिंगवर आंतरराष्ट्रीय हॅकाथॉनचे यशस्वी आयोजन

डिजिटल पुणे    11-02-2026 10:49:41

पुणे: पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड एंटरप्रेन्योरशिप येथे दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी एमबीए विद्यार्थ्यांसाठी डिझाईन थिंकिंगवर आधारित आंतरराष्ट्रीय हॅकाथॉन यशस्वीरित्या पार पडला. हा उपक्रम संस्थेच्या संचालिका (प्रभारी) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या हॅकाथॉनचे संचालन स्पेनमधील प्रसिद्ध कंपनी ‘रिव्हिया’ यांच्या वतीने करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय उद्योग पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.


हॅकाथॉनदरम्यान विद्यार्थ्यांनी संघात काम करत डिझाईन थिंकिंग प्रक्रियेअंतर्गत स्पॅनिश कंपन्यांसमोरील प्रत्यक्ष व्यावसायिक समस्यांचे विश्लेषण केले. त्यावर नाविन्यपूर्ण उपाय सुचवून प्रभावी सादरीकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसमोर मांडणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तार्किक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, संघकार्य व सादरीकरण कौशल्ये अधिक विकसित झाली.या आंतरराष्ट्रीय हॅकाथॉनमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अनुभवात्मक शिक्षणाची मौल्यवान संधी मिळाली. 


 Give Feedback



 जाहिराती