सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

पश्चिम बंगाली युवकाचा पुण्यात मृत्यू, ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत केली हळहळ व्यक्त

डिजिटल पुणे    12-02-2026 16:00:31

पुणे : पुण्यातल्या एका बांगलादेशी 24 वर्षे युवकाचा खून झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली आहे. ओळख आणि मूळ गावाच्या आधारावर पाठलाग करून छळ करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप  ट्विटच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

सुकेन महातो (वय ३०, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत युवकाचे नाव आहे.घटनेची माहिती सांगता खून झालेला बांगलादेशी युवक एका खासगी कंपनी मध्ये काम करत होता. तो त्याच्या तीन भावांसोबत एका खोलीत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. दोन दिवसा पूर्वी कोरेगाव येथे एका हॉटेल मागे त्याचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

पोलिसांनी याची चौकशी केली असता हा युवक त्याच्या कामावर गेला नसून दुपारी तीन पासूनच मद्य प्राशन करायला सुरुवात केली होती. मद्य प्राशन करत असताना कोणा सोबत भांडण झाली असावी आणि त्याचा खून झाला असावा अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली आहे. या घटनेत दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि ते लवकरच आपल्या ताब्यात येतील आणि खून करण्यात आलेले मूळ कारण आपल्या समोर येईल.


 Give Feedback



 जाहिराती