सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत महापौर मंजुषा नागपुरे यांची एसटीपी प्रकल्पांसाठी ठोस मागणी

गजानन मेनकुदळे    12-02-2026 18:30:59

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता कौन्सिल हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा दिपक नागपुरे यांनी शहराच्या पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.

पुणे शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि त्यानुसार निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजांचा सविस्तर आढावा महापौर नागपुरे यांनी यावेळी मांडला. विशेषतः सध्या कार्यरत असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) वाढत्या सांडपाण्याच्या प्रमाणामुळे अपुरे पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शहरातील विविध भागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन एस.टी.पी. प्रकल्प उभारणे, विद्यमान प्रकल्पांची क्षमता वाढविणे तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा औद्योगिक व बागायती वापरासाठी पुनर्वापर करण्याची आवश्यकता त्यांनी ठळकपणे मांडली. या उपाययोजनांमुळे नदीप्रदूषणावर नियंत्रण येऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल तसेच शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. पुणेकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही पावले महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती