सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात – मंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    13-02-2026 16:25:53

मुंबई : ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन २०२३  मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधीच्या ‘ग्रंथभेट’ योजनेंतर्गत २०२४-२५  या वर्षासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार २०२३  मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून निवड प्रक्रिया पार पडली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीमार्फत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील निवडक ग्रंथांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथे करण्यात आली असून या ग्रंथांचे वितरण सुरू झाले आहे.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ९४० शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये तसेच ६० मध्यवर्ती कारागृह ग्रंथालये अशा एकूण १ हजार लाभार्थी ग्रंथालयांना ग्रंथांचा लाभ देण्यात येणार आहे. ग्रंथपार्सल वितरणाचे काम टपाल खात्यामार्फत शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथून सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथांचा जास्तीत जास्त वाचकांना लाभ मिळावा यासाठी संबंधित ग्रंथालयांनी हे ग्रंथ  दर्शनी विभागात ठेवावेत, अशा सूचना ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती