सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवा टप्पा; सहा जणांवर आरोप निश्चित, 23 फेब्रुवारीपासून खटल्याची सुनावणी

डिजिटल पुणे    14-02-2026 13:07:09

पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड झाली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून खटल्याची नियमित सुनावणी येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर 58 दिवसांनी पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने आता प्राथमिक सुनावणीनंतर सहा आरोपींवर औपचारिक आरोप निश्चित केले आहेत. यामुळे खटल्याच्या पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस यांनी 14 जुलै रोजी 11 जणांविरोधात आरोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, दोन मुलं, एक मुलगी तसेच इतर सहा जणांचा समावेश होता. पुढील तपासानंतर सहा आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

16 मे रोजी पुणे जिल्ह्यातील भुकूम येथील सासरी वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह घरात आढळून आला होता. सुरुवातीला मृत्यू आत्महत्येचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली; मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाने वेगळे वळण घेतले. मृत्यू आत्महत्या की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला आणि राज्यभरात खळबळ उडाली.त्यानंतर वैष्णवीचे वडील यांनी 17 मे रोजी तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली.

आरोपींविरुद्ध हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच निलेश चव्हाण याच्यावर अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवून धमकावल्याचा अतिरिक्त आरोप असल्याची माहिती समोर आली आहे.न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने आता या बहुचर्चित प्रकरणाची नियमित सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पुढील सुनावणीत साक्षीदारांची नोंद आणि पुराव्यांची छाननी होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती