सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    16-02-2026 10:57:49

उरण :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा,आदर्श कल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती असून ही जयंती शिवजयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे, तालुका पनवेल येथे शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता भव्य ज्योत आगमन, सकाळी ११ वाजता मोफत आरोग्य शिबिर, दुपारी १२ वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता मान्यवराचे स्वागत व मनोगत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांनी,शिवप्रेमींनी या शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहराध्यक्ष संतोष काटे यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती