सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

डिजिटल पुणे    16-02-2026 10:59:29

मुंबई :  मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.


 Give Feedback



 जाहिराती