पुणे : बहुभाषिक साहित्य मंडळाच्या वतीने बहुभाषिक साहित्य संमेलनाचे आयोजन वेलकम हॉल कोंढवा येथे ज्येष्ठ कवी बा.ह.मगदूम अध्यक्षतेखाली दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या साहित्य संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला.बहुभाषिक साहित्य संमेलनात विविध पुस्तक प्रकाशन, पुरस्कार प्रदान,काव्यसंमेलन, पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. संमेलनाचे हे तिसरे वर्ष होते.
स्पंदन परिषदेचे संस्थापक इंतेखाब फराश यांनी सर्वांचे स्वागत केले ,कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांनी प्रस्ताविक केले . स्वागताध्यक्षा महेमूदा शेख यांनी स्वागत केले.यानंतर वृक्षाना जल अर्पण करून प्राचार्य इ.जा. तांबोळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार खलील खान,अनिस कुट्टी,अय्यूब अहमद नल्लामंदू उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित " टिफीन बॉक्स " व दिनकर लाकडे लिखित " फातीमा शैख " हे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. जेष्ठ कवी मुबारक शेख , प्रा.बी.एच. करजगीकर , एजाज चिनीवार ,तब्बसुम शेख, प्रा.युसूफ शेख यांना " फक्र-ई- मिल्लत जीवन गौरव " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
या नंतर अनिस कुट्टी,सदानंद माळी, बा.ह.मगदूम , प्रा.ताबोळी,नल्लामंदू यांनी साहित्याच्या विविध पैलूंवर विचार मांडले.त्यानंतर विविध स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले. सायराबानू चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी संमेलन झाले .सूत्रसंचालन बशीर काजी यांनी केले.गौस पाशा शेख यांनी आभार मानले .
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मुस्लीम कबीर,जाफर बांगी,शकील जाफर मंचर, तहसीन सय्यद , सदानंद माळी,दत्ता वालेकर,साईनाथ राहरटकर,शबाना गुलजार शेख ,मोहंमद शकील,आशा नष्टे , संगीता लाड आदि उपस्थित होते .
बहुभाषिकांमुळे महाराट्र राज्य आता आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे याचा आम्हाला अभिमान बाटतो .बहुभाषिकाच्या एकत्र येऊन संमेलन साजरे होत असता अनेक भाषिक व अनेक भाषिकांचे मने जोडण्याचे व राष्ट्रीय एकात्मतेला मजबूत करण्याचा महत्वाचा काम हे परिषद करत आहे असे उद्गार संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कवी बा.ह. मगदूम यांनी यावेळी बोलताना काढले.