सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

वाकडमध्ये निष्काळजीपणाचा फटका; खेळताना ३ वर्षांची चिमुकली १५ फूट खोल खड्ड्यात कोसळली, बिल्डरवर गुन्हा

डिजिटल पुणे    16-02-2026 16:08:25

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथे सुरक्षेअभावी घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाकडमधील पिंक सिटी रोडवरील अस्वानी गॅलक्सी सोसायटीच्या आवारात खेळत असताना तीन वर्षांच्या बालिकेचा अपघात झाला. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि पार्किंग सिस्टमच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास श्रीजा अनिल सांगळे (वय ३ वर्षे ९ महिने) ही आपल्या इतर मित्रांसोबत सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळत होती. गार्डनलगतच ‘एफ’ विंगजवळ पार्किंग पिटसाठी सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. मात्र या ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक व्यवस्था जसे की कठडा, संरक्षक भिंत किंवा जाळी  उभारण्यात आलेली नव्हती.खेळता खेळता संतुलन बिघडल्याने श्रीजा थेट या खोल खड्ड्यात पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला व पाठीला दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

या घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अस्वानी पॅराडाईज कंपनीचे बिल्डर तसेच किंग मल्टीलेव्हल कार पार्किंग सिस्टमचे संचालक जगन्नाथ राऊत यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षाव्यवस्था न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करत असून, घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बांधकामस्थळी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती