सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 DIGITAL PUNE NEWS

एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार

अजिंक्य स्वामी    16-02-2026 17:03:32

पुणे : एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया यांच्यात दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार सेमीकंडक्टर व व्हीएलएसआय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

हा सामंजस्य करार डॉ. सत्या गुप्ता (अध्यक्ष, व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडिया), श्री. शैलेश परब (सचिव), श्री. रणजीत येवले (मुख्य सदस्य), डॉ. डी. एस. बोरमने (प्राचार्य, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. एस. बी. धोंडे (विभागप्रमुख, अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग) आणि डॉ. एस. एस. निकम (सहयोगी अध्यापिका, अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या करारामुळे विद्यार्थ्यांना तज्ञ व्याख्याते व उद्योग नेत्यांशी थेट संवाद, व्हीएलएसआयमध्ये प्रगत कार्यशाळा व प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि उद्योग प्रदर्शनाच्या संधी, सेमीकंडक्टर व चिप डिझाइन तंत्रज्ञानातील संशोधन सहकार्य, तसेच सध्याच्या उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्य विकास आणि भारताच्या वाढत्या सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये नेटवर्किंग यांसारख्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

या सहकार्याबाबत बोलताना प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमने यांनी सांगितले की, शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योग तयारीसाठी एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय वचनबद्ध असून, या करारामुळे व्हीएलएसआय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि वाढीव रोजगारक्षमता मिळेल.

दरम्यान, एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती तसेच व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांनी प्राचार्य व अणुविद्युत आणि दूरसंचार विभागाचे अभिनंदन केले. हा सामंजस्य करार अत्यंत अभिमानास्पद असून, व्हीएलएसआय व सेमीकंडक्टर शिक्षणात उत्कृष्टता वाढविण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

 


 Give Feedback



 जाहिराती