सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

बॅ. नाथ पै संस्कार केंद्र पुणेच्या बाल अभिनय गीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण

डिजिटल पुणे    17-02-2026 17:01:18

पुणे : राष्ट्र सेवा दल संचालित बॅ. नाथ पै संस्कार केंद्र, पुणे आणि समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल अभिनय गीत स्पर्धा – २०२६ चा पारितोषिक वितरण समारंभ  उत्साहात पार पडला.अ‍ॅड.संपत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ  अभिनेते सुनील गोडबोले, नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसुदन झंवर, उद्योजक  कैलास परब, बांधकाम व्यावसायिक सुदर्शन इंगळे,रंजना इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. भगवान कोकणे यांनी केले. सूत्रसंचालन मंगला कांबळे व सीमा संभूष यांनी प्रभावीपणे पार पाडले. पाहुण्यांचा परिचय महादेव हेरवाडकर यांनी करून दिला. तर  आभार प्रदर्शन रजनी धनकवडे यांनी मानले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेत्री राधिका जाधव, अभिनेता-दिग्दर्शक तेजस इंदापूरकर आणि संगीतकार  अमोल काळे यांनी काम पाहिले.

बाल अभिनय गीत स्पर्धेत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक शाळा, धनकवडीने  प्रथम क्रमांक, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी बालक मंदिर, माळवाडी-हडपसरने  द्वितीय क्रमांक ,सुंदर शिशु विद्यामंदिर, खराडीने तृतीय क्रमांक पटकावला.स्वरचित गीत स्पर्धेत  वनाज परिवार पूर्व प्राथमिकने  प्रथम क्रमांक ,शारदा बालक मंदिर, आपटे प्रशालाने  द्वितीय क्रमांक,श्री सद्गुरू शंकर महाराज बालक मंदिर, कात्रजने तृतीय क्रमांक पटकावला. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुकाराम कदम,राकेश नेवासकर,अभिजीत आंब्रे, शिवराज सूर्यवंशी, रेखा शिंदे, प्रकाश कदम, नवनाथ लोंढे, मोनिका पोटे, शितल नूपनूर, लोहित भजनेवार, निशा नाईक-नवरे,  तसेच केंद्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे  सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आयोजन निळू फुले खुले सभागृह, साने गुरुजी स्मारक येथे दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते.

गेल्या ४५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेमुळे बालकलाकारांना अभिनय व गायन कौशल्य सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पुणे शहरातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अभिनय आणि गीत सादरीकरणातून बालकलाकारांनी आपले अप्रतिम कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. बालमनांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच स्टेज वरती मुक्त पणे वावरण्याची संधी निर्माण होते. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर घेतलेली मेहनत दिसून येते.

 


 Give Feedback



 जाहिराती