सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

‘गेटवे ऑफ इंडिया’च्या साक्षीने भारत–फ्रान्स संबंधांना नवी झळाळी ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख उपस्थिती

डिजिटल पुणे    18-02-2026 11:02:45

मुंबई :- गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी ‘इंडिया–फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमानिमित्त सायंकाळी भव्य ध्वनी-प्रकाश शोचे आयोजन करण्यात आले. फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने भारत–फ्रान्स मैत्रीचे नवे पर्व उजळून निघाले.या कार्यक्रमास राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

अरबी समुद्राच्या अथांग पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया परिसरात साकारलेल्या या नेत्रदीपक ध्वनी-प्रकाश कार्यक्रमातून भारत आणि फ्रान्सच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि परंपरांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास चालना मिळणार असल्याचे याव्दारे अधोरेखित झाले.यावेळी देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती