पुणे : SoftTech Solutions and Services यांच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी “ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Library Services)” या विषयावर महाराष्ट्रभरातील ग्रंथालय व्यावसायिकांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. भाऊसाहेब पनागे (एमेरिटस प्राध्यापक, Savitribai Phule Pune University), डॉ. किशोर इंगळे (प्रमुख, IRC, Tata Consultancy Services, पुणे) तसेच डॉ. विष्णू पवार (सिनेट सदस्य, Swami Ramanand Teerth Marathwada University) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलतत्त्वे, LLMs (Large Language Models), नैतिक AI, विविध AI साधनांचा वापर, सर्वोत्तम पद्धती तसेच ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी सहभाग कसा वाढविता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
संसाधन व्यक्ती म्हणून श्री. चेतन टाकसाळे, श्री. इद्रिश खान, श्री. प्रल्हाद जाधव, श्री. प्रदीप बच्चाव आणि डॉ. महेंद्र गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रांमध्ये प्रत्यक्ष उदाहरणांसह AI साधनांचा वापर कसा करावा, माहिती व्यवस्थापनात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत प्रात्यक्षिके देण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपावेळी १६ ग्रंथालय व्यावसायिकांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, लातूर, सोलापूर, ठाणे आणि नांदेड आदी जिल्ह्यांतून ५० हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन टाकसाळे, इद्रिश खान, डॉ. राहुल देशमुख, डॉ. राहुल विश्वे, डॉ. महेंद्र गुप्ता, रोहिणी टाकसाळे आणि दिलीप देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व टीम सदस्यांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले.ही कार्यशाळा ग्रंथालय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याचे मत सहभागींतर्फे व्यक्त करण्यात आले.