सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 DIGITAL PUNE NEWS

श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था आणि आई माऊली ग्राम संघातर्फे मोफत महिला आरोग्य शिबिर संपन्न! मेमोग्राफी व पेप्समेयर चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    19-02-2026 16:18:46

उरण : महिलांच्या आरोग्य प्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण आणि आई माऊली महिला ग्राम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी करंजा येथे मोफत मेमोग्राफी आणि पेप्समेयर  तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 
   
 
करंजा ग्रुप ग्रामपंचायत चांणजे येथील द्रोणागिरी देवीच्या मैदानात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शिबिर पार पडले.या शिबिरासाठी एमओसी कॅन्सर केअर सेंटर पनवेल यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. सेंटरचे नितीन पटेल, विजय औटी, सतीश पारेकर, ऋतुषा बामणे ,शगुप्ता खान यांनी उपस्थित महिलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले .कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे या उद्देशाने मेमोग्राफी आणि महत्त्वाच्या चाचण्या यावेळी विनामूल्य करण्यात आल्या. त्याचप्रमाणे उरणमधील सुप्रसिद्ध डॉ अजय कोळी आणि डॉ. विकास मोरे यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले.या सामाजिक उपक्रमासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे, कविता म्हात्रे आणि अभया म्हात्रे  यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच आई माऊली ग्राम संघाच्या अध्यक्षा अनु पाटील,नैना पाटील ,उज्वला म्हात्रे, तृप्ती घरत आणि निशा म्हात्रे यांचे शिबिराच्या नियोजनात मोठे योगदान लाभले.या शिबिराला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. ग्रामीण भागातील महिलांसाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती