सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मंत्रालय लाच प्रकरण! झिरवळांचे खाजगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त
  • अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न, विखे पाटलांचा थेट सवाल
  • : अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र
 जिल्हा

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक;नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    20-02-2026 10:59:51

उरण : उरण मध्ये रात्री अपरात्री तसेच दिवसा कधीही वाहनांचे अपघात होत असून यात अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तर काही जणांचे अवयव निकामी झाले आहेत. वाहणाच्या अपघातामूळे वेगवेगळ्या मालमत्तेचे आर्थिक नुकसानही मोठया प्रमाणात होत आहेत. अशा घटनांना वेळीच लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 राजेंद्र गणपत घरत (वय ५७ वर्षे) नवीन शेवा यांची हुंडाई वेणु कार नंबर MH 46 BQ 6919 ही कार दिनांक १६/२/२०२६ रोजी दुपारी ४  वाजताच्या सुमारास त्यांच्या नवीन शेवा येथील राहत्या घराच्या समोर पार्किंग मध्ये पार्क करून ठेवली होती.टेम्पो नंबर MH 46 BU 5927 वरील चालकाने राजन घरत यांच्या कारला जोरदार धडक देऊन अपघात केला. यामुळे राजन घरत यांची कार नंबर होंडाई वेणू कार नंबर MH46 BQ 6919 चे बंपर, ग्रील, पुढील नंबर प्लेट, एल ई डी लाईट, फोगलॅम्प याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही.मात्र या अपघातामुळे राजन घरत यांच्या वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटने संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अपघात करणाऱ्या सदर टेम्पो मालक, चालकावर योग्य ती कडक कारवाई करून झालेल्या वाहनाची आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजन घरत यांनी केली आहे. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला तरी त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे . अन्यथा अशा घटना उरण मध्ये वारंवार घडतील व कोणताही दोष नसताना नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊन त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.टेम्पो गाई गुरे चोरण्यासाठी आल्याचा नागरिकांना संशय आहे त्यामुळे सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
 
 


 Give Feedback



 जाहिराती