सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा
  • नागपुरात बारावीच्या केमिस्ट्री-फिजिक्स पेपरफुटीचा संशय; व्हॉट्सअॅप ग्रुपमधून प्रश्नपत्रिका प्रसारित? तपासाला वेग
  • बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर बिष्णोई गँगचा मोर्चा राजकारण्यांकडे? काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी
  • पोलीस भरतीच्या स्वप्नावर पडलं विरजण! शारीरिक चाचणीवेळी धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 जिल्हा

बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई; घरगुती IVF केंद्रातून ८ लाखांचा औषधसाठा जप्त

डिजिटल पुणे    21-02-2026 16:53:50

ठाणे : बदलापूर परिसरात उघडकीस आलेल्या कथित स्त्रीबीज विक्री प्रकरणात पोलिसांनी व्यापक छापेमारी करत मोठा साठा जप्त केला आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत घरातून सुरू असलेल्या अवैध IVF प्रक्रियेचा पर्दाफाश झाला. कारवाईदरम्यान सुमारे आठ लाख रुपयांची इंजेक्शन्स आणि विविध औषधे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर यांना अटक करण्यात आली असून अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे राज्याबाहेर तसेच परदेशातही पोहोचले असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रकरणाचा तपशील काय?

बदलापूरमध्ये एका घरातून स्त्रीबीज संकलन आणि विक्रीचे अवैध जाळे चालवले जात असल्याची माहिती समोर आली. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना विशिष्ट इंजेक्शन्स दिली जात होती. त्यानंतर संबंधित महिलांना काही IVF केंद्रांमध्ये पाठवून वैद्यकीय प्रक्रियेद्वारे बीज काढले जात असल्याचा आरोप आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही सोनोग्राफी आणि IVF केंद्रांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाने काही संशयित ठिकाणी धाडसत्र राबवले असल्याचे सांगितले जाते.

महिलांना आर्थिक आमिष

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या महिलांना १५ ते २० हजार रुपये देण्यात येत होते, तर मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना सुमारे ३ हजार रुपये मानधन दिले जात होते. जप्त करण्यात आलेल्या औषधसाठ्याचा वापर बीज वाढीसाठी केला जात असल्याचा संशय आहे. हे बीज तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि केरळसारख्या राज्यांत पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांची कारवाई

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकत हा प्रकार उघड केला. सध्या पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, वैद्यकीय नोंदी आणि संबंधित केंद्रांची चौकशी सुरू आहे.या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत असून तपास अधिक गतीने सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती