मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार असल्याची अधिकृत कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले होते. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास संदेश शेअर केला. चाहत्यांनी प्रेमाने दिलेल्या ‘विरोष’ या नावाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या नात्याचा सन्मान चाहत्यांना अर्पण केल्याचं म्हटलं आहे. “आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाला तुम्ही दिलेल्या प्रेमाचं आशीर्वाद असाच राहू द्या,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या लग्न समारंभाला त्यांनी ‘विरोष की शादी’ असं नाव दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.माहितीनुसार, येत्या २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे खाजगी पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हैदराबाद येथे दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती.

रश्मिका आणि विजय यांनी 2018 मधील गीता गोविंदम आणि 2019 मधील डियर कॉम्रेड या चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्या काळापासूनच दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.अधिकृत घोषणा आणि विवाहसोहळ्याचे तपशील समोर येण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.
गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये एकत्र झळकल्यानंतर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देत दोघेही आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत.चाहत्यांकडून या ‘विरोष’ जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.