पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'माझ्या मराठीची बोलू कौतुके ' हा अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नातू सभागृह, भारतीय विद्या भवन( सेनापती बापट रस्ता), पुणे येथे होणार आहे.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास तसेच आचार्य अत्रे, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, गदिमा, पु. ल. देशपांडे, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर आदी मान्यवर साहित्यिकांच्या साहित्याविषयी गप्पा, गोष्टी आणि गीतांचा आस्वाद अभिवाचनाच्या ओघात रसिकांना घेता येणार आहे.
कार्यक्रमाची निर्मिती शुभदा जोशी व कल्याणी भागवत यांनी केली असून हा एक वाचक चळवळीचा उपक्रम आहे.डॉ. शुभदा व मिलिंद ताम्हनकर, डॉ. सरिता व अमिताभ वैद्य तसेच सुचित्रा व दिलीप कुंभोजकर सहभागी होणार आहेत. प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.मराठी साहित्याची परंपरा, अभिजातता आणि वैभव यांचा गौरव करणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.