सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वडिलांची चिता धगधगत होती, 17 वर्षांच्या मुलीनं काळीज घट्ट करत दिला बारावीचा गणिताचा पेपर, लातूरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना
  • काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, काकींना सर्व मदत करु, पण तुमच्यासाठी लढा सुरुच राहील!
  • राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले, मी तुमच्यासाठी... ; अजितदादांच्या आठवणीत चित्रा वाघ भावूक
  • मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे, पुस्तकं झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे: राज ठाकरे
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये इंटरकॉलेजिएट पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा

डिजिटल पुणे    23-02-2026 15:33:33

पुणे : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र विभागाच्या वतीने इंटरकॉलेजिएट पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा – Insight-IRF (Insight Innovation Research Forum) चे आयोजन दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या करण्यात आले.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपले संशोधन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. विविध महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संगणक शास्त्र व आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन विषयांवर आपले सादरीकरण केले.

स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते झाले. संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. चौहान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण मौलिकता, संशोधन पद्धती, विषयातील योगदान व सादरीकरण कौशल्य या निकषांवर मूल्यमापन केले.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक व समन्वयक सौ. अर्चना सूर्यवंशी, प्रा. काजल कांबळे तसेच सर्व अध्यापक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रोत्साहन मिळाले असून भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.


 Give Feedback



 जाहिराती