सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वडिलांची चिता धगधगत होती, 17 वर्षांच्या मुलीनं काळीज घट्ट करत दिला बारावीचा गणिताचा पेपर, लातूरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना
  • काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, काकींना सर्व मदत करु, पण तुमच्यासाठी लढा सुरुच राहील!
  • राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले, मी तुमच्यासाठी... ; अजितदादांच्या आठवणीत चित्रा वाघ भावूक
  • मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे, पुस्तकं झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे: राज ठाकरे
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम 'उत्सव' म्हणून नव्हे, तर 'संस्कार'आणि विचारांचा जागर म्हणून साजरा

डिजिटल पुणे    23-02-2026 15:36:05

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात मात्र अत्यंत साध्या आणि अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणजे कुटुंबाचे प्रमुखच असतात, अशा दुःखद प्रसंगी कोणताही थाटमाट,झगमगाट न करता, केवळ वैचारिक जागर करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवत शिवरायांना अभिवादन करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता.

या शिवजयंती उत्सवाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.जी.लोबो आणि प्राध्यापक वृंद यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवजयंतीचे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

कार्यक्रमाची खरी रंगत श्वेता हुलावळे हिने दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि तिने सादर केलेल्या पाळण्याने वाढली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतांचे सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मधून शिवविचारांचा जागर ओघवत्या शैलीत केला. तब्बल दोन तास महाविद्यालयातील विद्यार्थी सोनाली सरोदे, तुषार देव, प्रकाश आखाडे, अलिजा शेख आणि अबोली कोडगयांनी आपल्या कविता आणि प्रभावी भाषणांतून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहास, कार्य आणि विचार यांना उजाळा दिला.

​यानंतर दिव्या कोकाटे, पूजा पाईकराव, सेजल सांगळे आणि समीक्षा मुंडे या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शौर्यगीत सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.डॉ.प्रकाश पांगारे यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या गनिमी काव्यावर आणि प्रशासनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जी.लोबो यांनीअध्यक्षीय मनोगत व्यक्त केले करताना सांगितले की, "आज आपण दुःखात आहोत, पण शिवरायांचे विचार आपल्याला संघर्षातही संयम राखण्याची प्रेरणा देतात."

या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रोहिणी गोरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी नियोजन डॉ. विजय बालघरे,डॉ. गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. शेवटी सेजल सांगळे हिने सर्वांचे आभार मानले आणि शिवगर्जना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

​अत्यंत साधेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे शिवरायांच्या विचारांचा जागर महाविद्यालयात घुमला पण त्याचबरोबर साश्रू नयनांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके नेतृत्व आणि संस्थेचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार साहेब यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती