सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण, पोलिसांनी तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त केली अन् नोटीस देऊन घरी सोडलं
  • विमाननगरातील स्पा सेंटरवर पोलिसांची कारवाई; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक जखमी
  • पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 राजकारण

कोंढा ते मुंबई : भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रेरणादायी प्रवास

डिजिटल पुणे    24-02-2026 10:50:44

नांदेड– मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे नवनाथ बन हे आज राजकीय संवाद आणि माध्यमविश्वातील प्रभावी नाव ठरले आहेत. सध्या त्यांची भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली असून, यापूर्वी ते २०२३ पासून भाजप महाराष्ट्राच्या माध्यम विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

शैक्षणिक आणि वैचारिक पायाभरणी

नवनाथ बन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावापासून चार किलोमीटर अंतरावरील महात्मा बसवेश्वर हायस्कूल, कामठा येथे झाले. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे कुटुंब नांदेडहून बीड येथे स्थायिक झाले. विविध ठिकाणच्या वास्तव्यातून त्यांना भिन्न संस्कृती, समाजरचना आणि लोकजीवन जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

विद्यार्थी चळवळीत सक्रिय भूमिका

महाविद्यालयीन काळात त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. २००४ ते २००८ या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये बीड शहरमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणविषयक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली.बीड जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी राबवलेल्या अभियानात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नेतृत्वगुणांच्या बळावर स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांची निवड झाली.

पत्रकारितेची वाटचाल

महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. २००८ साली बीडमधून पत्रकारितेला सुरुवात करत ‘गावकरी’ आणि ‘मराठवाडा नेता’ या दैनिकांमध्ये शहर व जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले.जुलै २०१० मध्ये त्यांनी तत्कालीन ‘स्टार माझा’ (आताचे एबीपी माझा) या वृत्तवाहिनीत प्रवेश केला. जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी निर्माता (Producer) म्हणून कार्य करत अनेक गाजलेले कार्यक्रम साकारले.त्यामध्ये – नमो व्हर्सेस रागा कोण होणार मुख्यमंत्री?नगरपालिकेच्या नाक्यावर ,या कार्यक्रमांद्वारे त्यांनी राज्यातील जनमानसाचा ठाव घेतला. लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि तरुणाईच्या करिअरविषयक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

सामाजिक आणि सांस्कृतिक भान

राजकारणासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील संवेदनशील दृष्टीकोन ही त्यांची ओळख राहिली. पंढरपूर वारीचे विशेष कव्हरेज असो किंवा ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद — त्यांच्या परखड प्रश्नांनी वेगळी छाप पाडली.

भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

पत्रकारितेतील दीर्घ अनुभव, जनमानसाची सखोल समज आणि प्रभावी शब्दसामर्थ्य यांच्या जोरावर त्यांनी भाजपमध्ये महत्त्वाची भूमिका स्वीकारली.

२०२३ पासून : भाजप महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख

सध्या : भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते

या भूमिकेतून ते पक्षाची भूमिका ठाम, मुद्देसूद आणि प्रभावीपणे मांडत आहेत.

तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

कोंढा या छोट्याशा गावातून मुंबईसारख्या महानगरात येऊन, केवळ मेहनत आणि वक्तृत्वाच्या बळावर माध्यमविश्वात आणि राजकीय संवादात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नवनाथ बन हे आज तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती