सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी व समृद्धी महामार्गावरील सुविधांबाबत आठ दिवसांत सभागृहाला अवगत करावे ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

डिजिटल पुणे    25-02-2026 10:28:15

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी, “पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी याबाबत बोलू शकेन. सन्माननीय सदस्यांना संपूर्ण माहिती घेऊन कळवू,” असे सांगितले.

या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा विषय केवळ एका सदस्यापुरता मर्यादित नसून जनतेशी निगडित आहे. अधिवेशन सुरू असताना सरकारने आठ दिवसांच्या आत याबाबत सविस्तर लेखी निवेदन सादर करावे, अशी त्यांनी विनंती केली.

तसेच समृद्धी महामार्गावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २२ फूड जॉईंट्सबाबत प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या २२ ठिकाणांची सकाळी व संध्याकाळी स्थिती दर्शवणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुढील आठवड्यात दाखवावे, अशीही त्यांनी सूचना केली. “आम्ही आमदारांनी वारंवार सांगण्यापेक्षा प्रशासनानेच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करावी. आम्हाला व  संबंधित आमदारांना प्रत्यक्ष दाखवा,” असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही समस्या कायम असल्याचे डॉ. गोऱ्हे  यांनी सांगितले. “मी स्वतः नुकतीच नाशिकला जाऊन आले असून पुन्हा भेट देणार आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी लोकांकडून येत आहेत. सुपरव्हिजनमध्ये काही त्रुटी राहात आहेत का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.समृद्धी महामार्गावरील सुविधा, रेस्टॉरंट्स व सेवा केंद्रांची अचूक माहिती गुगल मॅपवर अद्ययावत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, जेणेकरून प्रवाशांना प्रत्यक्ष सुरू असलेल्या सुविधा सहज उपलब्ध होतील.


 Give Feedback



 जाहिराती