सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 जिल्हा

बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा रोहित पवारांचा आरोप

डिजिटल पुणे    25-02-2026 12:56:09

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्यावर गंभीर आरोप करत, VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर दुपारी 1.36 वाजता DGCA कडून प्राथमिक अहवाल जारी करण्यात आला. या अहवालात फेब्रुवारी महिन्यात VSR कंपनीच्या विमानाचे ऑडिट झाले असून, त्यावेळी लेव्हल-1 प्रकारातील कोणतीही गंभीर त्रुटी आढळली नव्हती, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात असताना आणि शवविच्छेदन सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच VSR कंपनी, संबंधित एरो कंपनी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यासाठी ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाणार आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनीही 28 जानेवारीलाच संबंधित विमानात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी नसल्याचे विधान केले होते. तसेच पायलटबाबतही शंका नसल्याचे सांगितले होते, याकडेही रोहित पवार यांनी लक्ष वेधले.मात्र, काल सादर झालेल्या ताज्या अहवालात VSR कंपनीच्या विमानाच्या विशेष तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. उड्डाणापूर्वीचे एअरवर्दीनेस प्रमाणपत्र, एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशन या सर्व स्तरांवर त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही कंपनीला काही प्रमाणात पळवाट दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांना हस्तक्षेपाची मागणी

या संपूर्ण प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. मुंबईत FIR दाखल न झाल्यास बारामतीत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.“हा लढा केवळ माझा नाही, तर जनतेचा आहे. सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, DGCA आणि संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती