सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 जिल्हा

मोठीजुई गावात खेळ पैठणीचा सन्मान भगिनींचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला संपन्न

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    25-02-2026 14:00:36

उरण : सामाजिक,शैक्षणिक, कला- क्रिडा क्षेत्रात त्यासोबतच खास करुन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आपले अनमोल योगदान देणारी सामाजिक संस्था  म्हणून नावारूपाला आलेली संस्था अर्थात केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आणि या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर  यांच्या सौजन्यातून आणि डोलकर माघी गणेशोत्सव मित्र मंडळ मोठीजुई यांच्या  आयोजनातून एका आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं ते म्हणजे खेळ पैठणीचा सन्मान भगिनींचा. आपल्या रोजच्या कामकाजी जीवनात दहा अंगाने काम करणार्‍या  महिला भगिनींना रोजच्या  धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा आणि  आपल्या अंगी असणार्‍या कलागुणांना वाव मिळावा व त्यातूनच आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून  उरण तालुक्यातील मोठीजुई गावातील महिला भगिनीं करिता मनोरंजनातून खेळाचा आनंद मिळावा व खेळातून मिळालेल्या बक्षिसांचा आनंद साजरा करता यावा या करिता आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन आणि सादरीकरण केले.

ते महिलां भगिनींचे लाडकेभावजी खेळ पैठणीचा फेम  संदेशजी घरत  यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत आगळ्यावेगळ्या अश्या अंदाजात सादर केलेला हा कार्यक्रम खुपच रंगतदार आणि तितकाच आकर्षक असा ठरला.डोलकर माघी गणेशोत्सव मंडळ मोठीजुई ह्या मंडळाच्या  आयोजनातून आणि राजू मुंबईकर यांच्या सौजन्यातून साकारलेल्या  ह्या  कार्यक्रमा करिता मोठीजुई गावातील  महिलां - भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. खेळ पैठणीचा सन्मान भगिनींचा ह्या रंगतदार अश्या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ती  राणीताई परेश पाटील,द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली ती कविताताई कल्पेश पाटील तर  तृतीय क्रमांकाची मानकरी ठरल्या शर्मिलाताई जगदीश कोळी.

राजू मुंबईकर यांच्या सौजन्यातून आणि डोलकर माघी गणेशोत्सव मंडळ मोठीजुई यांच्या आयोजनातून साकारलेल्या  हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजनात्मक आणि परंपरेचा भागच नव्हता  तर महिलांच्या  एकतेचा, आत्मविश्वासाचा आणि सन्मानाचा उत्सव होता.ह्या  कार्यक्रमा करिता  प्रमुख मान्यवर म्हणुन  केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,राणीताई मुंबईकर कार्यक्रमाचे सादरकर्ते सूत्रसंचालक संदेशजी घरत,किशोरीताई घरत, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रजी पाटील उपस्थित होते.मोठीजुई  गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे आयोजक माणिक कोळी सुनिल कोळी,भानुदास कोळी,जनार्दन कोळी, भास्कर कोळी, माणिक कोळी सोबतच  मोठीजुई गावातील ग्रामस्थ मंडळी आणि महिलां - भगिनींच्या उत्स्फूर्त अश्या प्रतिसादात आणि  प्रचंड उपस्थितीत हा अनोखा आणि  रंगतदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


 Give Feedback



 जाहिराती