सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात FIR नोंदवण्यास नकार
  • बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपनीला वाचवायचा प्रयत्न, रोहित पवारांचा गंभीर आरोप
  • पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा
  • सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, 'मला निर्दोष मुक्त करा'
  • अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
 विश्लेषण

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात एफआयआर नोंदवण्यास नकार

डिजिटल पुणे    25-02-2026 16:08:25

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी (डीजीसीए) विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आमदार रोहित पवार यांची मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलिसांशी तीव्र वादावादी झाली. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याने हा वाद चिघळला.

रोहित पवार यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर उपस्थित होते. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते. पवार यांचे जबाब नोंदवण्यासाठी लॅपटॉपही आणण्यात आला. मात्र त्याचवेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि एफआयआर नोंदवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. “एफआयआर दाखल करणे हा आमचा अधिकार आहे,” असा पवार यांचा आग्रह होता. त्यावर “ज्याठिकाणी जायचे तिथे जा, पण येथे एफआयआर नोंदवू शकत नाही,” असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा पवार यांनी केला.

दरम्यान, डीजीसीएने व्हीएसआर कंपनीविरोधात कारवाई केल्याचे पत्रक जाहीर केले असून २५ पैकी ५ विमानांवरच कारवाई झाल्याचा आरोप पवार यांनी केला. नव्या पीएनएस कायद्यानुसार हा दखलपात्र गुन्हा ठरू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. “सामान्य प्रकरणांमध्ये तत्काळ एफआयआर होतो, मग या गंभीर प्रकरणात नोंद का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, संबंधित विमानतळ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, तेथे ते तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुढील कायदेशीर लढ्याचा इशाराही दिला.या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती