सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 क्राईम

घरफोडी प्रकरणी दोन सराईत चोर जेरबंद; २.८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

डिजिटल पुणे    26-02-2026 17:21:27

पुणे : हडपसर परिसरातील तरवडेवस्ती, महंमदवाडी येथे बंद घर फोडून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोन चोरांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २.८३ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल जप्त केला आहे.

दि. ३१ जानेवारी २०२६ ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान फिर्यादी यांच्या बंद घराचे दरवाजाचे कोयंडे तोडून अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४,००,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७/२०२६ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड (वय १९) आणि प्रशांत ऊर्फ चिक्या भारत कसबे (वय १९, दोघे रा. साठेनगर, तरवडेवस्ती, पुणे) यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १५.१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत २,१८,८९० रुपये), २२०.६ ग्रॅम चांदीचे दागिने (अंदाजे किंमत ६१,७४० रुपये) तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत ३,००० रुपये) असा एकूण २,८३,६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या कारवाईत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती