सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 विश्लेषण

पुण्यात ९ सराईत गुन्हेगार तडीपार; परिमंडळ ०२ कडून कठोर कारवाई

डिजिटल पुणे    26-02-2026 17:29:02

पुणे: पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये एकूण ९ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.

परिमंडळ ०२ अंतर्गत बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींवर बेकायदेशीर हत्यार बाळगणे व वापरणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण, घरात घुसखोरी, मालमत्तेचे नुकसान, चोरी, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे, बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ, पुरावा नष्ट करणे, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील आरोपी:

जालिंदर मसा मोरे (वय ४८)

अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६)

ओंकार लक्ष्मण सणस (वय २३)

राजू महादेव डेंगळे (वय २२)

आंबेगाव पोलीस स्टेशनकडील आरोपी:

आकाश गुलाबराव कांबळे (वय २१)

कृष्णा बबन लोखंडे (वय २४)

आर्यन बापु बेलदरे (वय २४)

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनकडील आरोपी:

सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३)

साहिल भिमा अष्टगे (वय २०)

सदर कारवाई मा. श्री. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, तसेच मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.परिमंडळ ०२ हद्दीतील रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर यापुढेही अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा विशेष भर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती