पुणे – वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन मोक्का गुन्ह्यातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. मु.पो. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४१७/२०२५ व ४३०/२०२५ तसेच कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २७७/२०२५ मध्ये भा.न्या.सं.च्या विविध कलमांनुसार तसेच मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. संबंधित आरोपी हा या दोन्ही मोक्का गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता व गुन्हा केल्यापासून फरार होता.दि. २५/०२/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी अमोल लाखे हा बार्शी, जि. सोलापूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
दि. २६/०२/२०२६ रोजी पहाटे पथकाने बार्शी येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग सुजाता तानवडे व सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन करत आहे.