सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

पुणे शहरातील विविध भागांत घरफोडी, अपघात व ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल

डिजिटल पुणे    27-02-2026 15:40:20

पुणे : पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांच्या वतीने दि. २६/०२/२०२६ रोजी रात्री ००.०० ते २४.०० वाजेपर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपघात, चोरी तसेच ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

खराडी येथे कार अॅक्सेसरीजची घरफोडी

खराडी परिसरातील ब्रह्मा कार डेकोर दुकानात अज्ञात चोरट्याने छताचा पत्रा कापून प्रवेश करत सुमारे ३ लाख ७४ हजार रुपयांच्या चारचाकी वाहनांच्या अॅक्सेसरीज चोरी केल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

बाणेरमध्ये विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा

बाणेर येथील पिओनी सोसायटीमध्ये २७ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेराहून पैशांची मागणी व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

वाघोलीत भरधाव बसची धडक; तरुणाचा मृत्यू

वाघोली येथे पुणे–अहिल्यानगर रोडवर भरधाव ट्रॅव्हल बसने दुचाकीस्वार तरुणाला पाठीमागून धडक दिल्याने तो चाकाखाली सापडून मृत्यू झाला. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट PMPML अॅपद्वारे फसवणूक

PMPML च्या अधिकृत अॅपसारखे दिसणारे बनावट मोबाईल अॅप तयार करून त्याद्वारे खोटे दैनंदिन पास बनवून विनातिकीट प्रवास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडीत कंपनीतून मोबाईल चोरी

वानवडी येथील एका खासगी कंपनीतून सुमारे १ लाख ५९ हजार रुपयांचे दोन मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

लोणीकाळभोर येथे यात्रेत दागिन्यांची चोरी

लोणी काळभोर परिसरातील यात्रेत गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी १ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व लहान मुलाच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन फसवणूक; १२.८० लाखांचा गंडा

नांदेड सिटी येथील ७३ वर्षीय नागरिकाला क्रेडिट कार्डच्या बहाण्याने एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगून सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने २५.३० लाखांची फसवणूक

कोंढवा येथील एका नागरिकाला जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत तब्बल २५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.सर्व संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती