धायरी (पुणे) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी कोमल कुटे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच महिला मोर्चा शहराध्यक्षा मनीषा लडकत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्रिय कामाचा अनुभव, संघटन कौशल्य आणि महिलांच्या प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन कुटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे कोमल कुटे यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पक्ष संघटन बळकट करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.