पुणे : पुणे जिल्ह शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे 'मराठी विभाग व ग्रंथालय विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिनाचे' आयोजन करण्यात आले होते. कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.अपर्णा पांडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो हे सांगत कुसुमाग्रजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. कुसुमाग्रजांच्या कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघु निबंध याविषयी माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी कुसुमाग्रजांच्या काही कविता सादर केल्या .प्रथम वर्ष कला या वर्गातील मानसी भिसे या विद्यार्थिनीने मराठी भाषा दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
तसेच एम. ए. द्वितीय वर्ष मराठी विभागातील विद्यार्थी स्वप्निल भालचिम याने स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. मराठी विभागाच्या डॉ. अपेक्षा नाकतोडे यांनी मराठी विषयाच्या उत्पत्ती पासून सद्यस्थिती पर्यंतचा आढावा घेत मराठी भाषेचे जतन करण्यासाठी सर्वांना आवाहन केले.त्याचप्रमाणे ग्रंथालय विभाग प्रमुख कॅप्टन विठ्ठल नायकवडी यांनी कुसुमाग्रजांबद्दल माहिती देत मराठी भाषेसंबंधी आपले विचार मांडले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.डॉ.वंदना पिंपळे यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी भाषेचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. संगीता जगताप यांनी आजच्या पिढी समोरील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून आजच्या पिढीला मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठीची अस्मिता जोपासण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याबद्दल भाष्य केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. दत्तात्रय फटांगडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.शर्मिला देवकाते यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री.
रामदास चिंचवडे, डॉ. विजय घाडगे, प्रा. डॉ.हसे,प्रा. संतोष सास्तुरकर, महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ. सुभाष व्हावळ, डॉ ज्ञानेश्वर जांभुळकर प्रा. अथर्व गायकवाड, प्रा. प्राजक्ता कुंभार, डॉ मनीषा खैरे, प्रा. नेहा बवले, प्रा अमृता इनामदार ,प्रा. प्रीती जोशी ,श्री. रवि लाड तसेच विविध शाखेतील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.