पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित राज्यस्तरीय ३९ व्या फार्मसी क्रिकेट करंडक स्पर्धेत पुरुष गटात पूना कॉलेज ऑफ फार्मसी , पुणे, तर महिला गटात इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी हा संघ विजेता ठरला.
दि. २१ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन भारती विद्यापीठ एरंडवणे संकुलात केले होते. बक्षीस वितरण समारंभात मानाचा फार्मसी करंडक व मानपत्र प्रमुख पाहुणे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे,चे प्राचार्य डॉ.राजेश पाटील यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदान करण्यात आले. पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.आत्माराम पवार उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर ,उपप्राचार्य डॉ.एल.सथियनारायणन उपस्थित होते. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रमुख पाहुणे ब्राऊनडोव्ह हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे उपाध्यक्ष चंदन राजमाने यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. पूना कॉलेज ऑफ फार्मसीने विजेतेपद पटकावले. इंदिरा कॉलेजने सलग पाचव्या वेळा तर आयोजक पूना कॉलेजने १५ वर्षानंतर फार्मसी कप जिंकला आहे.या स्पर्धेचे संयोजन अक्षय खांडके,डॉ.सतीश मंडलिक,फार्मसी करंडक संयोजन प्रमुख सौ.प्रियांका कंधारे व डॉ. ज्ञानदेवी मथुरे,डॉ.नीलेश देशमुख (क्रीडा प्रमुख) यांनी केले.ही स्पर्धा फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये संवाद व क्रीडासौहार्द वाढवण्यासाठी आयोजित केली जाते .या स्पर्धेत विविध महाविद्यालये व औषधनिर्माणशास्त्र कंपन्यांचे ११ पुरुष संघ व ७ महिला संघ सहभागी झाले होते.
महिला गटात शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (एस. वी.पी.एम) कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती आणि इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात अंतिम सामना खेळला गेला . इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम फलंदाजी करताना ८ ओव्हर मध्ये १०३ धावा केल्या. त्याला उत्तर देताना एस. वी.पी.एम कॉलेजने ४८ धावा केल्या. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी ने विजेतेपदाला गवसणी घातली.पुरुष गटात अंतिम सामना जीवनधारा फार्मा कंपनी आणि पूना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पूना कॉलेज ऑफ फार्मसीने २० ओव्हर मध्ये १५२ धावा केल्या.त्याला प्रतिउत्तर देताना जीवनधारा फार्मा कंपनी ने १४२ धावा केल्या