सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 DIGITAL PUNE NEWS

महाविद्यालयात आयोजित मार्केटिंग फेअर उद्योजकता निर्मितीस पोषक - डॉ. तुषार शितोळे

अजिंक्य स्वामी    28-02-2026 15:21:08

 पुणे : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि योग्य दिशा विध्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी प्रेरित करते. महाविद्यालयात आयोजित मार्केटिंग फेअर हे उद्योजक निर्मितीस पोषक आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी व्यक्त केले. वाणिज्य विभागामार्फत आयोजित मार्केटिंग फेअर उपक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. डॉ. शितोळे पुढे म्हणाले की, उद्योजकीय कौशल्य प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मार्केटिंग फेअर यांसारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक आहेत. महाविद्यालयात आयोजित उद्योजकतेसंदर्भातील उपक्रम हे उद्योजकता निर्मितीचे स्रोत आहेत. यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्केटिंग फेअर उपक्रम विद्यार्थ्यांना व्यवसायातील नवीन संधी मिळण्यास उपयुक्त आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य, आर्थिक नियोजन, जाहिरात कला, टीम वर्क विकसित करण्याची उत्तम संधी असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नविन्यापूर्ण पदार्थांची मेजवानी उपस्थित मान्यवरांना, पालकांना व विद्यार्थ्यांना दिली. या मार्केटिंग फेअर मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या मार्केटिंग फेअर मध्ये सणस मानसी संतोष, थिटे गौरी संतोष, सणस अमृता भगवान यांनी बनविलेल्या गावरान भाजी भाकरी या पदार्थास प्रथम क्रमांक, शेख जस्मिन पापा, बाठे समृद्धी दत्तात्रय, यादव जयश्री बाबासाहेब व इंगुळकर शरयू मनोज यांनी बनविलेल्या व्हेज मंचुरियन आणि काझी परवीन मन्नान, बिऱ्हामने सायली शिवाजी, गोरे मनीषा बापू, आंबवले मयुरी मारुती यांनी बनविलेल्या दम बिर्याणी या पदार्थास द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक श्रुतिका मयूर गाडे हिने बनविलेल्या पालक चीज बॉल या पदार्थास आणि तनुजा नंदकुमार देव हिने बनविलेल्या रोज कोकोनट बर्फी या पदार्थास विभागून तर शेलार लक्ष्मी अमृत आणि मांढरे तेजल सचिन यांनी बनविलेल्या फ्रुट कस्टर्ड आणि गाडे पौर्णिमा व गोळे पौर्णिमा यांनी बनविलेल्या ओळी भेळ या पदार्थास उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

या मार्केटिंग फेअर चे परीक्षण प्रा.डॉ.जगदीश शेवते, प्रा.एस.जी.रोडे, प्रा.डॉ.पौर्णिमा कारळे, प्रा.वैष्णवी कोंडे यांनी केले. सदर उपक्रमाचे संयोजन प्रा.जे.ई.गायकवाड, प्रा.माऊली कोंडे, प्रा.संदीप लांडगे, प्रा.डॉ.आर.बी.ढाकणे, प्रा.डॉ.एस.जी.घाडगे, प्रा.भगवान गावित, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.महेश कोळपे, प्रा.वनिता भालेराव, श्री.विकास ताकवले, श्री.शिवाजी सोनावणे, श्री.धनाजी माने, श्री.महेश दळवी, सीमा देशमुख, मनीषा मोहिते, सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


 Give Feedback



 जाहिराती