सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
  • नागपूर स्फोट प्रकरण : निष्काळजीपणाची प्राथमिक नोंद; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमेरिका अन् इराण युद्धाचा फटका, जळगावातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
  • इस्रायल-अमेरिका-इराण तणावाचा जागतिक बाजारांवर परिणाम; सेन्सेक्स 80 हजारांखाली, निफ्टीतही मोठी घसरण
  • मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
  • मोठी बातमी! महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता करात तब्बल 700 स्क्वेअर फूटापर्यंत करमाफी
 जिल्हा

‘बीडमध्ये भीषण अपघात! धुलवडीच्या आनंदावर विरजण; बीडमध्ये कार अपघातात तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

डिजिटल पुणे    02-03-2026 17:23:52

बीड :  देशभरात आज होळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत असून घरोघरी सकाळीच होळी पेटवून पूजन करण्यात आलं. तर, संध्याकाळी गावागावात मोठ-मोठ्या होळी पेटवल्या जाणार आहेत. त्यानंतर, सर्वत्र उद्या धुलीवंदन साजरे केले जाईल, मुंबईसह मोठ्या शहरात उद्यापासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रात धुलीवंदनाची तयारी सुरू आहे.होळी आणि धुलवडीचा उत्साह राज्यभरात सुरू असताना बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. धुलवडी साजरी करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड-शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ ही दुर्घटना घडली. कृष्णा मुळे (वय अंदाजे तरुण) हा आपल्या मित्रांसोबत धुलवडी निमित्त वॉटर पार्ककडे जात होता. दरम्यान, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला पलट्या खात जाऊन थेट विहिरीच्या कठड्याला धडकली. सुदैवाने वाहन विहिरीत कोसळले नाही; मात्र अपघाताची तीव्रता मोठी होती.

या दुर्घटनेत कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि आणखी एक युवक जखमी झाले आहेत. अपघातावेळी त्यांच्या मागेच मित्रांची दुसरी कार येत होती. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धुलवडीच्या सणावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती